निपाणी: भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करून शिवसेनेने शनिवारी सकाळी कागल कोगनोळी सीमेवर शिर्डी मोर्चा कडून पुतळ्याचे दहन केले होते. त्यानंतर बेळगाव येथेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते, तर बसवराज होरटी यांनीही अक्षेपार्ह विधान केल्याने कर्नाटक महाराष्ट्रातील सीमाभागात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सीमाभागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निपाणी, कोगनोळी परिसरातही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या काळात अनुचित घटना टाळण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील आंतरराज्य बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. दोन्ही राज्यातील आगारांनी एकमेकांच्या राज्यात असलेली बस सेवा पूर्णपणे बंद केली आहे.
दोन्ही राज्यातील तणाव वाढण्याची शक्यता असल्याने आंतरराज्य बस सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. त्याचप्रमाणे निपाणी आगारातून कोल्हापूर ,इचलकरंजी, गडहिग्लज, कागल, हुपरी, मुरगुड आणि परिसरात जाणाऱ्या सर्व बस बंद ठेवण्यात आली आहे. शनिवारी रात्री महाराष्ट्रातील कोल्हापूर कागल आगाराच्या काही बस निपाणी आगारात तर निपाणी आगारातील काही बस कोल्हापूर आगारात मुक्कामास होत्या.