आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे खेड तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एकूण ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि विद्यमान आमदार बाबाजी काळे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, भाजप, काँग्रेस, उद्धवसेना, शरद पवार गट व मनसे यांच्यात थेट लढत अपेक्षित आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले होते, तर आता भाजप, शिंदेसेना आणि उद्धवसेनाही तयारीने मैदानात उतरले आहेत. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि बेरोजगारी हे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असणार आहेत. येत्या काळात स्थानिक समीकरणे आणि मतदारांचा कल निवडणुकांचे निकाल ठरवणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले










































