इंदापूर-न्हावी: येथील महिला शेतकरी लताबाई अनिल रासकर यांच्या शेतीमधील विहरीत पाणी आहे. शेतकरी विद्युत पंपाद्वारे शेतीला पाणी देतात. शेती पंपाना कधी दिवसा तर कधी रात्री वीज उपलब्ध असते. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री रोहित्रा पर्यंत जाऊन तो विद्युत पुरवठा सुरळीत करीत असतात. तसेच शेतकऱ्यांना विजविषयक कोणतीही सुरक्षाविषयक उपकरणे नसताना ते जीव धोक्यात घालून ते वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असतात. ही शेतकऱ्यांची होणारी परवड पाहून सहसा शेतकरी विजजोडणी घेण्यास टाळाटाळ करीत असतात. परंतु मुख्यमंत्री कृषी सौर योजनेविषयी माहिती तालुका कृषी कार्यालयातून रासकर याना समजली. त्यानंतर त्यांनी नजीकच्या महावितरण च्या लोणी देवकर शाखेच्या महेश पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने तीन अश्वशक्ती साठी त्यांनी ऑनलाइन अर्ज केला.त्यासाठी त्यांनी सोळा हजार रुपये भरून नोंदणी केली.
त्यानंतर त्यांना संबंधित विभागाकडून सौर कृषी पंप बसवून तो कार्यान्वित करण्यात आला.
न्हावी परिसरात प्रथमच सौर कृषी पंप बसविल्याने शेतकऱ्यांना कुतूहलाचा विषय ठरला आहे .तसेच तेथील संबंधित वायरमन राहुल पळसे यांनी जोडणीसाठी प्रयत्न केले.
इंदापूर उपविभागात सध्या ४० हुन अधिक शेतकऱ्यांना या सौर कृषी पंपाची जोडणी केली असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत आम्हाला सौर पंप बसविल्यामुळे आता रात्री-अपरात्री विजपुरवठा खंडीत होत नाही.
-अनिल रासकर, शेतकरी
दुर्गम भागातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेमुळे विजजोड झाल्यामुळे फायदा झाला आहे आणि रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित होणार नाही.
-महेश पवार, सहायक अभियंता, महावितरण