या वर्षी २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान: साई संस्थान

शिर्डी: गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साईबाबांच्या चरणी आलेल्या देणगीमध्ये वाढ झाली आहे. विशेष करून त्यामध्ये परकीय चलन आणि ऑनलाइन, डेबीट-क्रेडीट कार्डच्या माध्यमातून जी देणगी प्राप्त झाली आहे, ती मागील वर्षीपेक्षा जास्त आहे. देणगीत मागील वर्षाच्या तुलनेत दोन कोटींची वाढ झाली आहे. यंदा साई चरणी तब्बल २८७ कोटींहून अधिक रकमेचे दान प्राप्त झाले आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षापेक्षा २०१९ या वर्षात यंदा साई चरणी अर्पण करण्यात आलेल्या देणगीमध्ये दोन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. साई संस्थानचे आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च असे असते. परंतु अनेकांना जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर वर्षात साई संस्थानला किती दान आले, याची उत्सुकता असते. प्रत्येक वर्षी साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या देणगीमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या कॅलेंडर वर्षाचा विचार केल्यास २०१८ मध्ये साई चरणी २८५ कोटी रुपयांचे दान आले होते. यंदा मात्र यामध्ये वाढ झाली असून २०१९ मध्ये साईबाबांच्या चरणी २८७ कोटी ६ लाख ८५ हजार ४१५ रुपये दान आले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा