पुणे प्रतिनिधी : आज सकाळी ११ च्या दरम्यान एका दुचाकीवर ऑईलचे कॅन घेऊन जात असताना रस्त्यावर दुचाकी वरून कॅन खाली पडल्याने वानवडी बाजार पोलिस चौकीसमोर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ऑईल सांडले असुन सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ वाहतूक रोखून धरण्यात आली होती .दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व पोलीस त्या ठिकाणी प्रवाश्याच्या सुरक्षेसाठी तेलावर गाड्या घसरू नयेत मनुन रस्त्यावर माती टाकण्याचे काम जलद गतीने सुरू आहे . व या ठिकाणी काही नागरिक घसरुन पडल्याने जखमी झाले आहेत.
मात्र सकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशी मात्र त्रस्त झाले आहेत. पुण्यामध्ये सकाळच्या वेळेस सर्वांचीच धावपळ सुरू असते त्यामुळे यावेळेस प्रचंड ट्रॅफिक चा सामना पुणेकरांना रोज करावा लागतो. त्यातही असा काही प्रकार घडल्यास वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. दरम्यान या सर्वांमध्ये ट्रॅफिक पोलिसांची व अग्निशामक जवानांची चांगलीच तारांबळ उडाली.