पुणे २७ फेब्रुवारी २०२६: आमदार रोहित पवार यांनी काल पुण्यातील सीआयडीच्या मुख्य कार्यालयात भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अनेक गंभीर आरोप केले. २८ जानेवारीच्या विमान दुर्घटनेप्रकरणी DGCA चा अहवाल आल्यानंतरही एफआयआर नोंदवला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.रोहित पवार म्हणाले, “DGCA कडून २४ तारखेला अहवाल आला. त्या अहवालात व्हीएसआरला जबाबदार धरण्यात आले, असे समजते.
मात्र आम्ही एफआयआर दाखल करण्यासाठी गेलो असताना तो स्वीकारण्यात आला नाही. बारामतीत तीन तास अधिकाऱ्यांसमोर बसूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सीआयडी तपास करत असल्याचे कारण देत एफआयआर नोंदवता येत नसल्याचे सांगण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार एफआयआर घेता येतो. पोलिस प्रशासन सहकार्य करत नसेल तर आम्ही कोर्टात जाऊ,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच त्यांनी नागरी उड्डाण मंत्री राम नायडू यांचा उल्लेख करत DGCA वर प्रभाव असल्याचा आरोप केला. “केंद्र सरकारच्या अखत्यारितील अहवालातून ‘घातपात की अपघात’ याचा निष्कर्ष काढणे कठीण आहे,” असे त्यांनी म्हटले.अजित दादांना दिलेले विमान खराब होते का? चुकून दिले की मुद्दाम?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात काही एजन्सींची नावे स्टेटमेंटमध्ये दिल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, “VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करणार नाही,” असा निर्णय जाहीर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान न वापरून छुपा पाठिंबा दिल्याचा दावा केला. आता बारामती विमान दुर्घटनेचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि एफआयआर नोंदवला जातो का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी: पूजा मालुसरे












































