काँग्रेस तोडफोड प्रकरणात आमदार संग्राम थोपटे यांची माघार

भोर : भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या थोपटे समर्थकांनी मंगळवारी(दि.३१) रोजी संध्याकाळी पुण्यातील काँग्रेस भवनची तोडफोड केली होती. मात्र या प्रकरणानंतर संग्राम थोपटे यांनी माघार घेतली आहे.
काँग्रेस कार्यालयाच्या मोडतोडीचा प्रकार निंदनीय आणि चुकीचा आहे. ही घटना घडली तेव्हा मी मुंबईला होतो. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे आमदार थोपटे यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्ही अंतिम मानतो.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठीनी पक्षाला योग्य वाटेल असाच निर्णय घेतला आहे. पुण्यातील काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी पुण्याला एखादे मंत्रीपद मिळायला हवे होते अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या घटनेबाबत काँगेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, आमदार संग्राम थोपटे यांच्याशी आपले बोलणे झाले असून त्यांची नाराजी दूर झाली आहे. काँग्रेस पक्ष हा कुटुंबासारखा असून संग्राम थोपटे यांचा योग्यवेळी नक्कीच विचार केला जाईल. काँग्रेस पक्ष त्यांना योग्य तो न्याय देऊन त्यांचा सन्मान करेल, असेही थोरात यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा