सामनामधून भाजपवर जोरदार टीका

मुंबई: काश्मिर प्रकरणावरुन शिवसेनेने मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. नौशेरा चकमकीदरम्यान महाराष्ट्रातील एक सैनिक शहीद झाला. जवानांच्या हौतात्म्यावर शिवसेनेने मोदी सरकारवर हल्ला चढविला आणि सरकारच्या काश्मीर धोरणावर प्रश्न उपस्थित केले. शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनामध्ये लिहिले आहे की, ‘एका महिन्यात महाराष्ट्राचे सात-आठ सैनिक शहीद झाले आहेत. महाराष्ट्राचा महाविकस आघाडी याला जबाबदार नाही. ते समजले पाहिजे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वारंवार सांगितले जात आहे, पण हे कितपत सत्य आहे?

त्याच बरोबर असे लिहिले होते की, ‘कलम -३७० हटविणे चांगले होते. यापूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झाले, परंतु हे सर्व करूनही काश्मीरमधील परिस्थिती बदलली का? दहशतवादी हल्ला अजूनही सुरू आहे, परंतु त्याच्या रिपोर्टिंगवर निर्बंध आहे. बंदुकीचा आवाज अजूनही थांबला नाही. काश्मीरमध्ये दळणवळणाची सुविधा सुरू झालेली नाही. तेथे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ‘एसएमएस’ सेवा सुरू केली गेली होती, परंतु इंटरनेट सेवा अद्याप बंद आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा