बगदाद वर पुन्हा अमेरिकेचा हला

बगदाद: अमेरिकेने शनिवारी सकाळी बगदादमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेने शुक्रवारी बगदादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी याच्यासह ८ जणांचा मृत्यू झाला होता.

शनिवारी पुन्हा एकदा अमेरिकेने पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सला लक्ष्य केले. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, अमेरिका ईराणसोबत युद्ध करू इच्छित नाही. परंतु, जर इस्लामिक राष्ट्राने प्रत्युत्तर म्हणून काही कारवाई केली तर अमेरिका याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. ट्रम्पच्या या वक्तव्याला काही तास उलटत नाही तोच अमेरिकेने आज शनिवारी पुन्हा एकदा हवाई हल्ला केला. जरी अमेरिका आणि इराणमधील तणाव नवीन नाही, परंतु इराणच्या सर्वात महत्वाच्या मेजर जनरलच्या हत्येनंतर मध्य पूर्वेत नवीन संघर्ष सुरू होताना दिसत आहे. हल्ला होण्याची शक्यता पाहून अमेरिकेने शुक्रवारी मध्यपूर्व प्रदेशात ३००० सैनिक पाठवण्याची घोषणा केली आहे. येथे त्यांनी यापूर्वीच १४,००० सैनिक तैनात केले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा