पुणे-शिवाजीनगर: शिवाजीनगर न्यायलयातील एका बेलीफला अडीच लाख घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले आहे .अडीच लाखामध्ये ३० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा होत्या आणी इतर नोटा या डमी होत्या आशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा अँन्टी करप्शनचा सापळा यशस्वी झाल्यानंतर संपुर्ण वकिल वर्गामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
अँन्टी करप्शधील सूत्रांच्या माहितीनुसार मनहोर कांबळे असे लाच घेणाऱ्या बेलिफचे नाव आहे. त्याने ऑर्डर करून देण्यासाठी ही लाच घेतली आहे, म्हणजेच डेक्कन येथील एका जागेचा ताबा न देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी झाल्यानंतर संबंधित तक्रारदाराने पुण्यातील अँन्टी करप्शनच्या कार्यलयात तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अँन्टी करप्शनच्या सापळा रचून ही कारवाई केली. ही कारवाई झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अँन्टी करप्शनच्या पथकाने ही कारवाई केली आहे.