पुणे -सोलापूर रस्त्याची दुरावस्था

लोणी काळभोर : सोलापूर पुणे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. साईडपट्ट्या खोलवर खचल्याने व निघून पडल्यामुळे त्यात नागरिक पडत आहेत व सर्व्हिस रस्त्यावर पाण्याची डबकी साचली आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

त्यामुळे दुचाकी चालकांना चारचाकी वाहने क्रॉस करताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या संरक्षक लोखंडी जाळी वाहन चालक वैतागून गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या( P W D)दुर्लक्षामुळे नागरिकांना आपला जिव मुठीत धरून जावे लागत आहे ,साईडपट्ट्या लावून घेण्याचे काम झालेले नाही. कदम वाकवस्ती मध्ये दोन ते तिन इंग्लिश स्कुल आहेत ,त्या रस्त्याने अनेक महिला व पालक आपल्या मुलाना शाळेत सोडण्यासाठी जात असतात या मार्गावर मोठी रहदारी असते. या मार्गावरून रात्रीचा प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.
सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या वर साईडपट्ट्या निघून पडल्या आहेत ,प्रवाशांचे व वाहन चालकाचे हाल सुरूच आहेत.परंतु रस्तादुभाजक ही काही ठिकाणी पडला आहे ,दुचाकीस्वारांना तो नसून अडचण ,असून अडथळा ठरत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा