पुरंदर : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत खंडोबा देवाची यात्रा असणाऱ्या पौष पोर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. जेजुरीच्या गाढवांच्या पारंपारिक बाजारात काटेवाडी ,गावठी आणि विविध प्रकारचे हजारो गाढवे दाखल झालेली असून चार हजार रुपयांपासून ते ४० हजारांपर्यंत भाव या गाढवांना मिळत आहे.
उभ्या महाराष्ट्रच लोकदैवत, कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा, पौषपोर्निमेनिमित जेजुरीत मोठी यात्रा भरली जाते , या यात्रेसाठी वैदू, बेलदार,गाडीवहार ,मातीवडार, कैकाडी, मदारी, गारुडी, घिसाडी, माकडवाले या भटक्या जमातीतील लाखो लोक जेजुरीत येतात. श्रीक्षेत्र जेजुरी येथे पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त भरलेल्या या पारंपरिक गाढव बाजारात सुमारे 2 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. सुमारे दोन हजार पेक्षाही जास्त गाढवांची यावेळी विक्री दरवर्षीच होत असते. जेजुरीत गाढव बाजारात गुजरात व राजस्थानमधून आणलेल्या गाढवांचा सुद्धा यात समावेश असतो.
आठ ते दहा हजार रुपये गावठी गाढवांच्या किमती होत्या तर काठेवाडी गाढवांना चाळीस हजार रुपयांपर्यंत भाव मिळातो. अशाच प्रकारचे बाजार मढी,सोनारी, माळेगाव (नांदेड)या ठिकाणी भरतात;परंतु जेजुरीचा बाजारसर्वात मोठा मानला जातो.यांत्रिक युगात गाढवाचे महत्व कमी होऊ लागल्याने या गाढवांच्या बाजाराला उतरती कळा आली आहे. मात्र यांत्रिक युगातही हा गाढवांचा बाजार आपले वेगळेपण टिकवून आहे.