पुणे: पुणे शहरातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाणदिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. सह पोलीस आयुक्त राजेंद्र शिसवे यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये शहरातील दाखल गुन्ह्यांची संख्या जवळजवळ साडेआठशेने कमी झाली. गंभीर किंवा शरीरावर हल्ल्यासंदर्भातल्या गुन्ह्यांची संख्या कमी झाली आहे. घरफोड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.
यंदाच्या वर्षात अपघातांची संख्या ही कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. हेल्मेटपोटी केलेल्या दंडाची रक्कम ही १०० कोटींच्या आसपास गेली आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांचे चांगलेच फावते आहे. त्यांना वेळीच आळा घालण्याचे आव्हान आता पोलीस प्रशासनासमोर आहे.
पुण्यातल्या गुन्ह्यांची आकडेवारी :
● खून : ७४
● खुनाचा प्रयत्न: १२१
● मारामारी : १५५
● दरोडा : २०
● घरफोडी : ४६०
● बलात्कार : २२४
● साखळी चोरी : ६४
● वाहनचोरी : १६७८