स्वराज्यासाठी नेतृत्व देण्याची महत्वकांक्षा राजमाता जिजाऊंनी ठेवून कार्य केले: हर्षवर्धन पाटील

इंदापूर (प्रतिनिधी) दि.१२: शिवभक्त परिवार, इंदापूर आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर महाविद्यालयामध्ये स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.

अमर शहीद जवान प्रदीपकुमार उमाकांत शेटे (गोतोंडी) यांच्या वीरपत्नी श्रीमती पुष्पलता प्रदीपकुमार शेटे यांना या वर्षीचा जिजाऊ पुरस्कार संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले आणि नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. वीरपत्नी सुरेखाताई जाधव, वीरपत्नी मस्के यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला तसेच आजी-माजी सैनिकांच्या माता व पत्नी यांना साडी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार येसाजी कंक यांची दिव्य तलवार सर्व शिवप्रेमींना दर्शनासाठी उपलब्ध केली होती.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ एक करारी महिला, राष्ट्र प्रेमाने प्रेरित झालेली महिला म्हणून तसेच स्वराज्याला नेतृत्व देण्याची महत्वकांक्षा मनामध्ये बाळगून राजमाता जिजाऊंनी आपले कार्य सुरू ठेवले. जीवनात सुखदुःख येथील परंतु ज्या ज्या वेळेला आपल्याला अडचणी येतील तेव्हा राजमातेचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा सगळ्या संकटावर मात करण्याची ताकद राजमातेच्या चेहऱ्यावर आहे. भारताच्या कल्याणासाठी आणि जनतेच्या उद्धारासाठी स्वामी विवेकानंदांनी आपले कार्य केले. शिकागोतील त्यांचे भाषण राष्ट्र प्रेमाचे प्रतीक आहे. शिवभक्त परिवाराने राष्ट्रप्रेमाची ज्योत सर्वांच्या मनगट आणि हृदयात निर्माण केल्याबद्दल डॉ.लक्ष्मण आसबे यांचे मनापासून धन्यवाद.’
डॉ. लक्ष्मण आसबे यांनी इतिहासातील अनेक प्रसंगाचे दाखले देत राजमाता जिजाऊंचा स्वराज्यसाठीचा प्रेरणादायी प्रवास सांगत जिजाऊ जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर आपण ज्या प्रकारे साजरी करतो त्या प्रकारे व्हावी तसेच शहीद जवानांची नावे इंदापूर तालुक्याच्या गावातील मुख्य रस्त्याला द्यावी अशी मागणी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ संजय कंक यांनी सरदार येसाजी कंक यांची शिवाजी महाराजांच्या काळातील कामगिरी सांगितली. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल राजवर्धन पाटील तसेच सुवर्णपदक विजेते पृथ्वीराज नलवडे, हर्षदा बारवकर, प्रा.दत्ता रास्ते आणि गलांडवाडी नंबर एक लेझीम पथक, साताऱ्याचे तुतारी वादक गुरवबंधू, बावड्याचे जय भवानी हलगी वादक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, नगराध्यक्षा अंकिता शहा, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, राजवर्धन पाटील, सभापती पुष्पा रेडके, सुरेश मेहेर , महेंद्र रेडके, बाळासाहेब मोरे उपस्थित होते. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले की, छत्रपती शिवाजीमहाराज समजून घेण्यापूर्वी राजमाता जिजाऊ यांचे चरित्र समजून घेणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी तत्व योग, राज योग याविषयी जगभर प्रचार केला. युवा या शब्दाच्या उलट वायू हा शब्द तयार होतो युवकांनी आपली मरगळ झटकून राष्ट्रभक्ती जागृत करावी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार फलफले यांनी केले. आभार बापू जामदार यांनी मानले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा