राज्य विभाजनासाठी केंद्राची भूमिका महत्त्वाची: नाना पटोले

शिर्डी: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शिर्डीच्या साई दरबारी येऊन साई समाधीचे दर्शन घेतले.
राज्य प्रगतीकडे जावे, व राज्यातील जनता सुखी समाधानी राहावी अशी प्रार्थना साईबाबांकडे पटोले यांनी केली.
राज्य विभाजनाची मागणी जनतेमधून होत असली तरी त्यासाठी केंद्राची भूमिका महत्त्वाची आहे, असे सूचक वक्तव्य पटोले यांनी यावेळी केले.
नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार हे ब्रम्हा, विष्णू, महेश या विचारांचे सरकार आहे. या सरकारमध्ये काही बदल होतील असे वाटत नसल्याचेही ते म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्ष म्हणून सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचा समन्वय साधून जनतेच्या भल्याचे निर्णय व्हावेत अशी आपली भूमिका असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
संयुक्त महाराष्ट्र म्हणून राज्य पुढे जावे असे काहींचे विचार, तर राज्याच्या विभाजनाची मागणी ही त्या त्या विचारांच्या लोकांची असू शकेल, असे सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.गो. वैद्य यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे ४ राज्यांमध्ये विभाजन करावे, अशी मागणी केली होती, त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा