17 तारखेला पीएम माेदी पुण्यात येणार

25
विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. 
 
 भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पुण्यातून निवडणूक लढवत असल्याने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची 17 तारखेला पुण्यात सभा होणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. 
 
 तसेच याच दिवशी सातारा येथे देखील मोदींची सभा होणार आहे. 
 
 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यातील आठही मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार निवडुण आले हाेते. यंदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.