बालेवाडीत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उभारणार दहा हजार खाटांचे रुग्णालय

पुणे, दि.११ मे २०२०: पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने बालेवाडी येथे १० हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार असून त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज (दि.११)रोजी दिली.

यावेळी गायकवाड म्हणाले की, पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. पुण्यात कोरोनाचे रुग्ण आता ३ हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या रोगामुळे १४५ नागरिकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी – चिंचवड शहरासाठी बालेवाडी येथे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

याशिवाय कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील रुग्णांवरही या ठिकाणी उपचार करता येणार आहेत. या रुग्णालयाची जबाबदारी साखर आयुक्त सौरभ राव आणि पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्यावर देण्यात आली आहे.

ज्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. त्या रुग्णालयाची क्षमता आता संपली आहे. त्यामुळे तातडीने बालेवाडी येथे १० हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडाही पुणे महापालिकेकडून तयार करण्यात आला आहे. त्यासाठी लागणाऱ्या स्टीलच्या खाटा, व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा पुणे महापालिकेने निर्णय घेतल्याचे आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा