पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात निगडीतील रहिवाशी असलेल्या एका ५२ वर्षीय कोरोनाबधित महिलेचा सोमवारी ( दि. २०) रोजी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेवर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
या महिलेला १८ एप्रिलला कोरोनाची लागण झाली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या मृत महिलेला किडनीचाही आजार असल्याचे समोर आले आहे. संबंधित उपचारासाठी त्या महिलेला कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. याशिवाय या महिलेला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही आजार असल्याचे समोर आले आहे.
मात्र या महिलेला कोरोनाची नेमकी लागण कशामुळे झाली ही माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.