शेतात झोपलेल्या ५५ वर्षीय महिलेवर वाघाचा हल्ला, महिलेचा मृत्यू

सिहोर (मध्य प्रदेश), १३ फेब्रुवरी २०२१: मध्य प्रदेश मधील सिहोर जिल्ह्यातील बुधनी वन क्षेत्रातील दुंगारिया गावातील शेतात झोपलेल्या एका ५५ वर्षीय वृध्द महिलेवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात या वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर उपस्थित पोलीस व वान अधिकाऱ्यांनी महिलेचा मृतदेह पिस्टमार्टम साठी पाठवला आहे. घटनेची माहिती मिळताच गावामध्ये दहशत पसरली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.

घटनास्थळी उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की, पोलिस आणि वनविभागाची टीम घटनास्थळी पोचली तोपर्यंत उशीर झाला होता. वाघाने वृद्ध महिलेचे पोट आणि पाय खाल्ले होते. यावेळी वनविभाग आणि पोलिसांच्या पथकाने त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला, मग तो पळून जाण्याऐवजी गर्जना करू लागला. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. मग तो तेथून निघून गेला. वनविभागाने मृतांच्या नातेवाईकांना १० हजारांची मदत दिली आहे.

याप्रकरणी माहिती देताना वनविभागाने सांगितले की, महिलेवर वाघाने हल्ला केला ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मृताच्या पतीला तातडीने १० हजारांची मदत देण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात असून वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. ही महिला जंगलाशेजारी शेतात बनवलेल्या झोपडीत राहत होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा