भारतीय संघाला मोठा धक्का, तिसऱ्या वनडेतून रोहित शर्मासह तीन खेळाडू बाहेर

rohit sharma india vs bangladesh odi, ८ डिसेंबर २०२२: बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका गमावल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन दुखापतीमुळं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडलेत. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही माहिती दिलीय.

भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळला गेला. यात हे तिन्ही खेळाडू जखमी झाले. तसंच या सामन्यात भारतीय संघाला ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर बांगलादेशनं पहिल्या वनडेत एका विकेटने विजय मिळवला होता. अशा प्रकारे त्याने मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतलीय.

रोहित, कुलदीप, दीपक मुंबईला परततील

पण आता मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना १० डिसेंबर रोजी चितगाव येथे होणार आहे. याआधी टीम इंडियासाठी ही वाईट बातमी समोर आलीय. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘नक्कीच कुलदीप, दीपक आणि रोहित पुढील सामन्यात खेळू शकणार नाहीत. कुलदीप आणि दीपक मालिकेतून बाहेर आहेत. रोहितही पुढचा सामना खेळू शकणार नाही.

प्रशिक्षक द्रविड म्हणाले, ‘तो मुंबईला परत जाईल, जिथे तज्ञ त्याची तपासणी करतील. त्यानंतरच तो कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होणार की नाही हे कळंल. मात्र हे तिघेही मालिकेतील शेवटची वनडे खेळू शकणार नाहीत हे नक्की.

डाव्या अंगठ्यातून रक्तस्त्राव

वास्तविक, बांगलादेशच्या डावात दुसऱ्याच षटकात रोहितला ही दुखापत झाली. हे षटक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने केले. रोहित दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता आणि षटकाच्या चौथ्या चेंडूवर अनामूल हक झेलबाद झाला, जो रोहितला पकडता आला नाही. दरम्यान, चेंडू लागल्यानं त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यातून रक्त येऊ लागलं.

दुखापतीवर भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) ट्विट केलं की बीसीसीआय वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीचं मूल्यांकन करत आहे, त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच वेळी, दीपक चहरला अंगठ्याची तक्रार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त तीन षटके टाकली. तर कुलदीप सेनला पाठीचा त्रास आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा