पुणे, १९ ऑक्टोबर २०२२: जगात सापांच्या दोन हजारांहून अधिक प्रजाती आहेत, त्यातील काहीच सापांची माहिती आपल्याला आहे. खरे तर साप… हे नाव जरी ऐकले तर बर्याच लोकांना भीतीने घाम फुटतो. साप हा या जगातील सर्वात भयावह प्राणी आहे आणि जर तो ‘अजगर’ असेल तर… अलीकडेच सोशल मीडियावर एका अजगराचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, जो भिंतीवर चढून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
To go up,
One doesn’t need a staircase every time ☺️☺️ pic.twitter.com/UIix7uby89— Susanta Nanda (@susantananda3) October 17, 2022
अलीकडेच, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक अजगर पायऱ्यांच्या बाजूच्या भिंतीवर चढताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अजगर सावकाश चालत असून पुढे जाण्याचा मार्ग शोधताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये गडद रंगाचा हा अजगर पाहिल्यानंतर घाबरणे स्वाभाविक आहे. या अजगराचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा भयानक व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटर हँडलवर शेअर केला आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘प्रत्येक वेळी वर जाण्यासाठी शिडीची गरज नसते.’ आतापर्यंत चाळीस हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘ज्याने व्हिडिओ शूट केला त्याच्या धैर्याची मी फक्त कल्पना करू शकतो! तर दुसरा म्हणतोय की, ‘आश्चर्यकारक! मी आतापर्यंत अनेक साप पाहिले आहेत, पण असा जिन्याच्या भिंतीवर चढणारा अजगर कधीच पाहिला नाही आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.