मध्य प्रदेश, ३१ मे २०२३ : लग्न म्हंटलं अनेक स्वप्न आपण रंगवतो. बँड बाजा, हॉल, हॉलमधील लग्नाचा डेकोरेशन, वरात, नवरी, नवरदेव, येणारे पाहुणे, नातेवाईक, मित्रपरिवार, लहान मुलांचा किलबिलाट रुचकर जेवण, दोन कुटुंबाचं पाहुणचार अशा अनेक गोष्टींची सांगड घातलेला थाट म्हणजे लग्न. अलीकडील काळात याच लग्नांमध्ये बरेच वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. आणि विचित्र घटना देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत ज्यामुळे एक नातं सुरू होण्याआधीच संपून जाते.
अनेक वेळेस लग्नामध्ये रुसवे फुगवे होत राहतात आणि त्यांना विनवण्याचे काम इतर मंडळी करतच असतात पण आज आपण जी गोष्ट पाहणार आहोत या सर्वांपेक्षा बरीच वेगळी आहे. रुसवे फुगव्यांपेक्षाही विचित्र घटना मध्य प्रदेश मध्ये घडली आहे. ज्यामध्ये नातेवाईक किंवा इतर कोणते पाहुणे, मित्रपरिवार लग्नातील वर आणि वधू सामील नसून प्रशासनानेच एक विचित्र प्रकार केला आहे.
मध्यप्रदेश मधील झाबूआमध्ये मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळा पार पडत होता. तिथे या विवाह सोहळ्यात मेकअप बॉक्सच्या डब्यात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या देण्यात आल्या आहेत. अश्या विचित्र घडलेल्या घटनेमुळे तेथील सर्व जोडप्यांमध्ये खळबळ उडाली. या घटनेमुळे लग्न समारंभातील अनेक मंडळी नाराज झाली. या प्रकरणावर काय प्रतिक्रिया द्यायची यासाठी थोडा वेळ नागरिक चक्रावले होते.
या प्रकरणावर वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं. ज्यामध्ये आम्ही कंडोम आणि गोळ्या दिले नाहीत असं मत त्यांनी नोंदवलं. आरोग्य विभागाने कुटुंब नियोजनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या गोळ्या आणि कंडोम दिले असे त्यांनी म्हटले. पण एकंदरीतच अशा कृत्यामुळे चांगले शुभ कार्यात विघ्न आले. जर जागरूकता निर्माण करण्यासाठी असे पाहूल शासनाकडून उचलले गेले असले तरीही योग्य की अयोग्य याचे चिंतन होणंही तितकच गरजेचे आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : निखील जाधव