नवी दिल्ली, २३ फेब्रुवरी २०२१: आरोपींने त्याच्या आईला दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता, आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने संतप्त होऊन आईवर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी सांगितले की, मृतक महिलेच्या पोटाला व हाताला गंभीर जखमा झाल्या आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
दारूची आवड असलेल्या मुलाने आईलाच भोकसले…..
ही घटना दिल्लीच्या खजुरी खास परिसरातून समोर आली आहे. येथे कलयुगी मुलाने आपल्याच आईची हत्या केली. आदल्या दिवशी एका मुलाने आपल्या ६४ वर्षीय आईवर (राम लल्ली) चाकूने वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दिल्ली पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. त्याचबरोबर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सुशील पांडे (वय २२) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आईने मुलाला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत तर त्याने चाकूने आईची हत्या केली. आई घरी एकटी असताना तिची हत्या करण्यात आली. आरोपीने त्याच्या आईला दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता, आईने पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने संतप्त होऊन आईवर चाकूने हल्ला केला. पुढे ते म्हणाले की, मृत महिलेच्या पोटाला व हाताला गंभीर जखमा झाल्या आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
पण, या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईला दारूसाठी मारले या दुर्दैवी घटनेमुळे आजच्या नात्यावर पुन्हाएकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव