मुंबई, २५ जानेवारी २०२३ : मुंबईतील वांद्रे परिसरात बेस्टच्या एका बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यांना कोणताही धोका पोहोचला नाही. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आग एवढी भीषण होती की, यात बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.