फलटण शहरात अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल

फलटण, १५ फेब्रुवारी २०२३ : फलटण येथील तौसिफ ऊर्फ छोटू अब्दुल शेख, गजानन चौक, शुक्रवार पेठ, फलटण (ता. फलटण, जि. सातारा) हा फलटण शहरात अवैद्ध प्रतिबंधित गुटखा मोटारसायकलवरून घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच पोलिस उपनिरीक्षक पवार, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती दीपाली गायकवाड, अशोक वाडकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन जगताप, पोलिस नाईक, सुजित मेंगावडे, पोलिस कॉन्स्टेबल यांनी स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा, लक्ष्मीनगर, फलटणजवळ सापळा लावला होता. काही वेळानंतर संबंधित व्यक्ती मोटारसायकलवरून जात असताना दिसला असता त्यास लागलीच थांबवून त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची झडती घेतली असता वाहनासह अवैध गुटखा असा एकूण १,२१,८४८/- लाख रुपयांचा ऐवज आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन अन्न, औषधी प्रशासनाचे श्री. सोनवणे साहेब, तसेच विकास रोहिदास सोनवणे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग (महाराष्ट्र राज्य) फ्लॅट नंबर १, शिवाजी हौसिंग सोसायटी, सदर बाजार, सातारा यांनी तक्रार दिल्याने फलटण शहर पोलिस ठाण्यात ‘भादंवि’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई समीर शेख, पोलिस अधीक्षक सातारा, बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक, सातारा, तानाजी बरडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली डी. एस. पवार, पोलिस निरीक्षक, महिला पोलास उपनिरीक्षक श्रीमती दीपाली गायकवाड यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केणेकर हे करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा