पुणे, २१ ऑक्टोबर २०२२: कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झालेल्या आरोपपत्रात मदत करण्यासाठी व तक्रारदारांच्या आई वडीलांना अटक न करण्यासाठी तब्बल ५० हजारांची लाच मागणाऱ्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून दोघेही या गुन्ह्यात फरार झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक हर्षदा बाळासाहेब दगडे आणि पोलीस शिपाई अभिजीत विठ्ठल पालके यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपपत्रात तक्रारदारांच्या बाजुने मदत करण्यासाठी व त्यांच्या आई वडील आणि बहीणीला अटक न करण्यासाठी दगडे आणि पालके या त्यांच्याकडे लाचेची मागणी करत होते. परंतू लाच देने मान्य नसल्याने त्यांनी एसीबीला या बाबत तक्रार केली होती. त्यानंतर यांची दखल घेत संपूर्ण पडताळणी केल्यानंतर हे दोघेही ५० हजारांची लाच मागताना दिसून आले होते.
त्यानंतर एसीबीच्या तक्रारीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेहीजण फरार झाले आहेत. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधिक्षक सुरज गुरव यांच्या पथकांने केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर