बारामती, २४ सप्टेंबर २०२० : बारामतीतील एका स्थानिक साप्ताहिकाचा संपादक संतोष पोपट जाधव (रा.वसंतनगर, बारामती) याच्यावर घरात घुसून मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनला दि.१८ सप्टेंबर रोजी गु.र.नं.४७०/२०२० कायद्यांतर्गत नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी संतोष जाधव याने फिर्यादी महिलेच्या अनाधिकाराने घरात घुसून फिर्यादीचा मुलगा आशिष यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला. आरोपी जाधव याने फिर्यादीचा डावा हात धरला, फिर्यादीने विरोध केला असता फिर्यादीच्या अंगास झटुन, अंगावरील कपडे फाडुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादी त्याच्या तावडीतून सुटुन पळत असताना आरोपी जाधव याने त्याच्या हातात असलेली काठी फिर्यादीच्या उजव्या हातावर मारुन जखमी केले असल्याची फिर्याद त्रस्त महिलेने शहर पोलिसांकडे दाखल केली आहे.
बारामती शहर पोलिसांनी भादवी कलम ३५४ , ४५२, ३२४ , २९४ , ५०४, ५०६, २६९ , २७० साथीचे रोग २, ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना.डोईफोडे करीत आहेत. सतत समाजात असंतोष निर्माण करणारा आरोपी संतोष असल्याने वसंतनगर मध्ये चर्चेला उधाण आले आहे.सार्वजनिक कामात एखाद्या पक्षाने लोकहितार्थ कार्यक्रमात अडथळा घालणे, शासनाच्या अधिकारी कर्मचार्यांना तक्रारी करणे, राजरोसपणे बेकायदेशीर वाळूचे ट्रक, ट्रॅक्टर अडविणे, एखाद्या नव्याने उद्योग उभारणीस सुरूवात केली असता त्या उद्योगाचे फोटो काढणे त्यास त्रास देणे, उपोषणाचा इशारा देवून वेठीस धरणे असेही सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना वेठीस धरणे असे प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत. मात्र त्याबाबत तक्रार करण्यास कोणीही धजावत नव्हते या झालेल्या कारवाई बाबत सगळीकडे कौतुक होते आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी