न्यूयॉर्क शहरात मांजरीला झाली कोरोनाची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : (२४ एप्रिल २०२०)
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेमध्ये असणाऱ्या प्राणी संग्रहालयात एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाल्याची बातमी आली होती. आता याच प्राणी संग्रहालयात मांजरालाही कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यूयॉर्क शहरातील दोन मांजरीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. त्यामुळे प्राण्यांना कोरोनाची बाधा होत असल्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आहेत, अशा भागात पाळीव प्राण्यांना जाऊ देऊ नये, असे डॉ.अश्विनीकुमार यांनी सांगितले आहे. याशिवाय पाळीव प्राणी जर बाहेरचे खात पित असतील तर त्यांच्यावर नजर ठेवण गरजेचं आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत वाघिणीला झालेली कोरोनाची बाधा तेथील एका कर्मचाऱ्यामुळे झाल्याचे प्राणिसंग्रालय प्रशासनाने सांगितले होते. या घटनेनंतर पर्यटकांसाठी प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा