ओडिशाच्या बालासोर मधील रेल्वे दुर्घटना स्थळी सीबीआय पथक दाखल चौकशी सुरू

ओडिशा, ६ जून २०२३ : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातस्थळी आज सकाळी केंद्रीय अन्वेषण ब्युरो चे पथक चौकशीसाठी पोहोचले. रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस रेल्वे बोर्डाने रविवारी केली होती. त्यानुसार सीबीआयचे पथक सोमवारी रात्री उशिरा बालासोरमध्ये दाखल झाले. सीबीआयचे पथक रेल्वे दृर्घटनेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहे.

रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने सरकारने सीबीआयला पत्र लिहिले होते. त्यानुसार सीबीआयने चौकशीला सुरुवात केली आहे. दुर्घटना स्थाळावरुन परतलेल्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिलकुमार लाहोटी यांनी पंतप्रधान कार्यालयात जाऊन अपघाताबाबतची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. लाहोटी हे आज परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे समजते.

दुर्घटनेसाठी रेल्वेचे कर्मचारी जबाबदार होते ? की रेल्वेच्या सिग्नल व इलेक्ट्रॉनिक इंटरलाँकिंग प्रणालित बिघाट करुन घातपात घडवून आला, याचा सर्वप्रथम शोध घेतला जाणार आहे. अपघातात रेल्वेच्या चालकांची चूक नसल्याचे तसेच गाड्यांच्या वेग मर्यादेबाहेर नसल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले होते. दरम्यान रेल्वेचे काही वरिष्ठ अधिकारी या घातपाताच्या प्रकारात असल्याच्या संशयही व्यक्त केला जात आहे. यांचीही चौकशी केली जाणार आहे. अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा