भारतातील कोविड- १९ च्या सध्यस्थिती चा पूर्ण आढावा

नवी दिल्ली, दि. २७ मे २०२०: कोविड-१९ च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने श्रेणीबद्ध, पूर्वदक्षता घेऊन सक्रीय उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

लॉकडाउनचा अनेक प्रकारे लाभ झाला आहे आणि प्रामुख्याने रोगाचा प्रसार होण्याचा वेग मंदावला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मोठ्या संख्येने मृत्यू आणि बाधित प्रकरणे टाळता आली आहेत. त्याच वेळी, लॉकडाउन कालावधी दरम्यान कोविड -१९ संबंधी आरोग्याच्या विशिष्ट पायाभूत सुविधा, ऑनलाईन प्रशिक्षण मॉड्यूल आणि वेबिनारच्या माध्यमातून मनुष्यबळ क्षमता विकास; चाचणी क्षमतेत वाढ; पुरवठा, उपकरणे, ऑक्सिजन आदी सामुग्रीत वाढ, संबंधित मार्गदर्शक तत्त्वे जारी करणे, मानकांची आखणी, प्रसार, स्वीकार, निदान, औषध चाचण्या, लस संशोधन विकास करण्यात आला तसेच तांत्रिक दृष्ट्या, देखरेख प्रणाली कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह अधिक मजबूत करण्यात आली, आरोग्य-सेतूसारख्या साधनांसह घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले.

लॉकडाऊन दरम्यान कोविड-१९ व्यवस्थापनासाठी आवश्यक आरोग्याच्या पायाभूत सुविधा वाढवण्यात आल्या. २७ मे २०२० पर्यंत, १,५८,७४७ आयसोलेशन बेड्स, २०,३५५ आयसीयू बेड आणि ६९,०७६ ऑक्सिजन संलग्न बेडसह ९३० समर्पित कोविड रुग्णालये उपलब्ध आहेत. १,३२,५९३ आयसोलेशन बेड्स १०,९०३ आयसीयू बेड आणि ४५,५६२ ऑक्सिजन संलग्न बेडसह २,३६२ समर्पित कोविड आरोग्य केंद्रे कार्यान्वित केली आहेत. देशात सध्या कोविड- १९ चा सामना करण्यासाठी १०,३४१ विलगीकरण केंद्रे आणि ६,५२,८३०७,१९९ खाटांसह ७,१९५ कोविड केअर केंद्रे उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने ११३.५८ लाख एन ९५ मास्क आणि ८९ . ८४ लाख वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) राज्ये / केंद्रशासित प्रदेश / केंद्रीय संस्थांना पुरवली आहेत. देशात ४३५ सरकारी प्रयोगशाळा आणि १८९ खासगी प्रयोगशाळांच्या (एकूण ६२४ प्रयोगशाळा) माध्यमातून चाचणी क्षमता वाढली आहे. कोविड -१९ साठी आतापर्यंत एकूण ३२,४२,१६० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे, तर काल १,१६,०४१ नमुने तपासण्यात आले.

देशात एकूण १,५१,७६७ रुग्ण आढळले असून यापैकी ६४,४२६ रुग्ण बरे झाले आहेत आणि बरे होण्याचा दर ४२.४% आहे. मृत्यूचा दर २.८६% असून जागतिक स्तरावर सरासरी मृत्यू दर ६.३६% आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा