बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजाच्या तरुणांचा “पोलिसांसाठी एक दिवस” उपक्रम

29

बुलढाणा: कोरोनाचा प्रादूर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण देशात लॉकडाउन केलेले आहे. या काळात पोलीस कर्मचारी मात्र आपल्या कुटुंबियांना सोडून नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर रात्रंदिवस उभे आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम.

याचीच एक जाणीव आणि सामाजिक भान ठेवून बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील तरूणांनी “पोलिसांसाठी एक दिवस” हा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमातून या पोलीस बांधवांसाठी हे देऊळगाव राजा येथील तरुण दररोज पाणी व चहा स्वतः जाऊन त्या पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत पोचवतात. त्यातून त्या पोलिसांचा थकवा दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

या उपक्रमात विशाल डोईफोडे, वैभव तोडरमल, आणि श्रेयस खावडे हे चार तरुण पोलीस कर्मचाऱ्यांना सेवा देण्याचे काम करत आहेत.

तरी या लॉकडाउनचे पालन सर्व नागरीकांनी करावे आणि अनावश्यक पणे कोणीही बाहेर फिरू नये,यासाठी पोलीस कर्मचारी हे दिवस रात्र सर्वत्र तैनात आहेत.गावागावामध्ये येऊन ते आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. त्यात हे तरुण राबवत असलेला उपक्रम खरंच अभिनंदनीय असा आहे.

                                                                                            प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा