विकासकामांना गती देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली विस्तृत बैठक संपन्न

पुणे, २८ ऑक्टोबर २०२० : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रलंबित विकास प्रकल्प आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रभागातील वॉर्डस्तरीय विकासकामांना गती देण्याची आग्रही मागणी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे अध्यक्ष मा.जगदीश मुळीक यांनी केली.

शहराध्यक्ष मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत यासंदर्भात विस्तृत बैठक संपन्न झाली.

पुण्यनगरीचे महापौर मा.मुरलीधर मोहोळ,आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, मा आ बापूसाहेब पठारे,उपमहापौर मा.सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष मा.हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे,तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, कुणाल खेमनार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीला ७३ नगरसेवक उपस्थित होते.

शहराध्यक्ष मुळीक यांच्या सूचनेला प्रतिसाद देत शहरातील विकासकामे तातडीने सुरू करण्याचे आदेश आयुक्त कुमार यांनी प्रशासनाला दिले.

भामा आसखेडचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, समान पाणीपुरवठा योजनेला वेग द्यावा, नालेसफाई करावी, प्रस्तावित उड्डाणपूल व रस्त्यांची कामे मार्गी लावावी, शहरातील कचरा व्यवस्थापन सुरळीत करावे, वॉर्डस्तरीय विकासकामांना मंजुरी देऊन ती सुरु करावीत आदी सूचना शहराध्यक्ष मुळीक यांनी केल्या.

नगरसेवकांनी प्रलंबित कामांबाबत सूचना केल्या व त्याच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला. बैठकीस सर्व खातेप्रमुख तसेच भारतीय जनता पार्टीचे शहर प्रभारी मा.गणेश बिडकर, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे,संदीप लोणकर,दीपक पोटे, दत्ताभाऊ खाडे या बैठकीस उपस्थित होते.सभागृह नेता धीरज घाटे यांनी प्रस्तावना केली, आयुक्त विक्रम कुमार यांनी या विषयावर खुलासा केला तर मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीचा समारोप केला. अशा पद्धतीने ३ बैठका संपन्न होणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा