सायकलवर गावी जाणाऱ्या कुटुंबाला वाहनाने उडवले,पती पत्नीचा जागेवर मृत्यू

दिल्ली, दि.९ मे २०२० : लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व उद्योग धंदे बंद आहेत. कोणाच्याही हाताला काम नसल्याने मजुर आपल्या गावची वाट धरत आहेत. काही मजूर धोका पत्करून आपल्या गावी जात आहेत. नुकतीच औरंगाबाद जवळ मजुरांना रेल्वेने चिरडल्याची घटना समोर असताना लखनऊ मधून देखील एक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये सायकलवरुन गावी जाणाऱ्या मजुराच्या संपूर्ण कुटुंबाला मागून भरधाव येणाऱ्या कारने चिरडले आहे. त्यात ४५ वर्षीय मजूर आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झालाय.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हे मजुर दाम्पत्य आपल्या चिमुरड्यांसह सायकलवरुन गावी छत्तीसगड येथे चालले होते. मात्र एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. मात्र अज्ञात वाहनचालक तिथून पसार झाला. या अपघातात कृष्णा साहू आणि प्रमिला कृष्णा साहू या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोन चिमुरड्यांना किरकोळ जखमी झाले आहेत. बुधवारी(दि.६) च्या मध्यरात्री ही घटना घडली. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्याने या कुटुंबाला उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते. त्यामुळे या कुटुंबाने आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला असावा. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. आणि ही दुर्देवी घटना घडली. पोलीस त्या कार चालकाचा शोध घेत असून मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे सोपावण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा