पिंगोरी येथे विजेच्या खांबावरील शॉटसर्किटमुळे शेतकऱ्याचे सपर जळले

पुरंदर, ३० डिसेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या पिंगोरीच्या खोऱ्यात विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट होवून लागलेल्या वणव्यात शेतकऱ्याचे शेतातील छप्पर जळून मोठे नुकसान झाले आहे. सुमारे दीड लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा येथील तलाठी यांनी केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंगोरी येथील शेतकरी ओमकार ज्ञानदेव यादव यांच्या शेताच्या कडेला आसलेल्या खांबावर शॉर्ट सर्किट मुळे ठिणगी पडली. त्यानंतर माळावरील वाळलेल्या गवताने पेट घेतला. गवत पेटल्याने त्याची आग शेतातील साहित्य ठेवण्यासाठी बनवलेल्या सपरा पर्यंत गेली.यामध्ये सपराने सुद्धा पेट घेतला.

सपरा मध्ये शेतीसाठी असणारे सर्व साहित्य जळून गेले. तसेच विहिरीच्या बांधकामासाठी आणलेले सिमेंट, पीव्हीसी पाईप, शेती मशागतीच्या औजारे व इतर साहित्य जळून गेले. पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे व तलाठी संजय खोमणे यांनी या ठिकाणी भेट दिली असून नुकसानीचा पंचनामा केला आहे. उद्या तो शासकीय मदतीसाठी तहसीलदारांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती तलाठी संजय खोमणे यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना पोलीस पाटील राहुल शिंदे म्हणाले की, विज वितरणाने नव्यावे टाकलेल्या अनेक वीज वाहक लाईन या सदोष आहेत. दर वर्षी ट्रान्सफॉर्मर असलेल्या ठिकाणी ठिणगी पडून आग लागण्याच्या घटना घडत असतात. अनेक वेळा गावातील ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून ही आग विजवली जाते. मात्र, अनेक वेळा तिथे वेळेत मदत पोचू शकत नाही अशावेळी शेतकरी व वन विभागाचे मोठे नुकसान होते. या वर्षी अशा घटना घडू नयेत म्हणून वीज वितरणाला जाळ पट्ट्या लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, विज वितरण कडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा