मित्राला अखेरचा सलाम! शिंजो अबेंना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मोदी झाले भावूक

टोकियो, २७ सप्टेंबर २०२२ : जपान आणि भारताचे द्विपक्षीय संबंध हे कायमच मित्रत्वाचे राहिले आहेत. त्यामुळेच जेव्हा जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची हत्या झाली तेव्हा भारतानं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता. तसेच भारतानं आपला चांगला मित्र गमावल्याची भावना व्यक्त केली होती. त्याचाच पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केला आहे. दिवंगत अबे यांच्यावर आज शासकीय इमामात अत्यंसंस्कार पार पडले. या कार्यक्रमाला मोदींनी हजेरी लावली असून यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना भावूक झाले आहेत.

शिंजो अबे यांच्यावर जपानची राजधानी टोकियो येथील निप्पॉन बुडोकन हॉल इथं शासकीय इतमामात अत्यंसंस्कार केले जात आहेत. या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कालच जपानकडे रवाना झाले होते, त्यानंतर आज त्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींसह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होणार आहेत. राजकीय प्रोटोकॉलप्रमाणे हे अंत्यसंस्कार होणार आहेत.

जपानच्या नारा शहरातील प्रचार सभेदरम्यान आबे यांची ८ जुलैला हत्या करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या पार्थिवावर १५ जुलैला अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शिंजो आबेंवर जपान सरकारकडून आज जवळपास तीन महिन्यांनंतर राजकीय इमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

१९९३ मध्ये वडिलांच्या निधनानंतर शिंजो आबे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना सर्वाधिक मतं मिळाली आणि शिंजो आबे यांची लोकप्रियता वाढत गेली. वयाच्या ५२ व्या वर्षी ते जपानचे पंतप्रधान झाले. जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे.शिंजो आबे सर्वाधिक काळ जपानचे पंतप्रधान राहिलेले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा