राजकोट मध्ये एका कोविड रुग्णालयात भीषण आग, सहा रुग्णांचा मृत्यू

राजकोट, २७ नोव्हेंबर २०२०: गुरुवारी रात्री गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात भीषण आग लागली. या अपघातात एकूण सहा जणांचा जळून मृत्यू झाला. राजकोटच्या शिवानंद रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागली. कोविड रुग्णालय असल्याने एकूण ११ रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णालयात एकूण ३३ रुग्ण दाखल झाले. आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक जवानांना पाठविण्यात आले होते, त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.

आगीच्या मोठ्या भडक्यामुळे अनेक रुग्ण भाजून निघाले आहेत. जखमी अवस्थेत त्यांना दुसर्‍या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवानंद रुग्णालयात दाखल केलेल्या सर्व रूग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सद्यस्थितीत कोणतेही अधिकारी आगीच्या कारणांविषयी बोलण्यास तयार नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या उर्वरित रुग्णांना अन्य रूग्णालयात हलविण्यात येत असून इतर कामांकडे लक्ष दिले जात आहे. नंतर आगीचे नेमके कारण शोधण्यात येईल. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ही आग आयसीयूमधून सुरू झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा