शाळेत सायकलवर जाणाऱ्या मुलीला बसने उडवले; मुलगी गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

जालना, २१ फेब्रुवारी २०२४ : जालन्यात एका शाळकरी मुलीला बसने उडवल्याची घटना घडली आहे. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शेख हिबा शेख शब्बीर (वय बारा वर्षे) असे मुलीचे नाव असून ती रोडवरून शहरात सयकलवर येत होती. तेवढ्यात छत्रपती संभाजी नगर येथून जालनाकडे येत असताना बसचा भोकरदन नाका परिसरातील ब्युटी फर्निचर समोर अपघात झाला. ही बस नाशिक आगाराची असून बसने मुलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत तिच्या डोक्याला आणि हाताला मार लागला असून ती गंभीर जखमी झाली. तर तिच्या सायकलचा चुराडा झाला आहे.

अपघात होताच नागरिकांनी गर्दी करत जखमी मुलीला खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलं. दरम्यान या अपघातात शेख हिबा शेख शब्बीर हिला जबर मार लागला असून तिचे दात खिळखिळे झाले आहेत. शिवाय तिच्या चेहऱ्यावर देखील जखमा झाल्या आहेत. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा