नांदेडच्या हिमायतनगर मध्ये मंगल अक्षदा कलशाची भव्य शोभायात्रा

हिमायतनगर, नांदेड ३० डिसेंबर २०२३ : श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा कलश यात्रेची भव्य शोभायात्रा, आज रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथून निघाली. त्या शोभयात्रेचे स्वागत मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व गावकऱ्यांनी शोभ यात्रेच्या मार्गावर रांगोळी व सुशोभीकरण करून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत कलश यात्रेचे स्वागत केले.

या शोभा यात्रेमध्ये हजारो महिला व भजनी मंडळींनी आपल्या डोक्यावर कलश घेऊन जय श्री रामाचा गजर केल्याने, वाढवणा नगरी दुमदुमून गेली होती. टाळ मृदुंगाच्या निनादात आणि राम नामाच्या गजरात काढलेल्या या भगव्या शोभा यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी हजारो महिला, पुरुष भजनी मंडळ, बजरंग दल, विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नागेश शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा