सोलापूरच्या कुरुल गावात कै.विष्णु बाबु धोत्रे यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन

सोलापूर १८ डिसेंबर २०२३ : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कुरूल येथे कैलासवासी विष्णु बाबु धोत्रे यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य निकाली कुस्तीसाठी शिवसेना नेते तथा उद्योजक श्री.राजु खरे यांच्या तर्फे ७१००० हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेची कुस्ती उद्योजक मा.श्री.राजु खरे यांच्या मार्फत लावण्यात आली. सदर कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मा.श्री.राजु खरे साहेब यांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला.

या कुस्ती स्पर्धेसाठी पंढरपुरचे माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे, वस्ताद बाळासाहेब चवरे, मोहोळ विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख मा.प्रकाश(दादा)पारवे, बेगमपुर सरपंच मा.प्रकाश सपाटे, युवा नेते मा.गणेश जाधव, उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख मा.उमाकांत करंडे, मोहोळ तालुका उपप्रमुख मा.अमर सोनवले, मा.चंदनशिवे सर, मा.लखन वाघमारे, मा.निखील गायकवाड, मा.आतिश सावंत व समस्त कुरुल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नवनाथ खिलारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा