जागृती ग्रुप व मुकुंद माधव फाउंडेशनकडून ‘एक हात मदतीचा’

पुणे, दि. ८ मे २०२० : जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे.संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने एक हात मदतीचा या संकल्पनेने पुणे जिल्ह्यातील ” जागृती ग्रुप व मुकुंद माधव फाउंडेशन” च्या वतीने समाजातील मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंब, रोजंदारीवर काम करणारी कुटुंब, हातावर पोट असणाऱ्या कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

लॉक डाऊनमुळे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील काही नागरिक पुण्यामध्ये अडकून राहिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी ” एक हात मदती” चा म्हणून त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे घरो- घरी जाऊन वाटप करण्यात आल्या. जागृतीचे संस्थापक राज देशमुख व जागृतीच्या सचिव मनिषा वाघमारे, अध्यक्ष रवींद्र भोसले, यांनी मदत केली.

स्वतः गरजूपर्यंत जाऊन ही मदत पोहचवण्याचे काम करत आहेत. फक्त पुण्यातच नाही तर उस्मानाबाद, नगर या जिल्ह्यातील तडवळा, खामगाव, कोंबरवाडी, दुधगाव, या गावांमध्ये सुद्धा जीवनावश्यक वस्तू व किराणा धान्य वीस-पंचवीस दिवस पुरेल इतका गोर- गरीब लोकांना देण्यात आला. असे या व्यक्तींचे सेवा कार्य चालुच आहे.

जागृती ग्रुप व मुकुंद माधव फाउंडेशनच्या वतीने आत्तापर्यंत ९१५० कुटुंबांना ही मदत करण्यात आली आहे. यापुढेही अशीच मदत चालू राहील.असे वाघमारे यांनी सांगितले.

यावेळी अंबिका वाघमारे, प्रत्येक गावचे सरपंच यांच्या उपस्थितीत गोरगरीब लोकांना मदत करण्यात आली. यासाठी राज देशमुख, रवींद्र भोसले, रोहित पाटील यांची मदत मोलाची ठरत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा