कोरोनाच्या संकटात ‘एम’ असोसिएशनचा एक हात मदतीचा.

पुणे: अॅग्रो इन्पुटस् मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया या कृषी निविष्टा (खते औषधे) उत्पादन क्षेत्रातील नामांकित संस्थेच्या वतीने कोरोना पेशंटला हाताळण्यासाठी डाॅक्टर व इतर कर्मचारी वर्ग यांना स्वयं संरक्षण करण्यासाठी उपयुक्त असलेल्या साहित्याचे वाटप एम. असोसिएशन च्या वतीने करण्यात आले. दिनांक २२ एप्रिल २०२० रोजी पुण्यातील ससून रूगणालय आणि नायडू रूगणालय त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये एकुण २४० स्वयं संरक्षण साधनांचे ( PPE KIT) वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मार्केट यार्ड परिसरात एक हजार मास्कचे वाटप करण्यात आले.
पुणे येथील गुळटेकडी मार्केटयार्ड परिसरातील एकुण ५० गरजू कुटूंबियांना अन्न – धान्य किराणा साहित्य असलेले वस्तूंचे किट असे एकूण साडेतीन लाख रुपये किंमतीच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

पुणे महानगर पालिका आयुक्त यांना प्राथमिक स्वरूपात किट सुपूर्त करताना उजवीकडे “एम” असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे, मध्यभागी संस्थेचे सदस्य मिलिंद बर्वे, डावीकडे आयुक्त मा.शेखर गायकवाड साहेब.

ससून जनरल हाॅस्पिटल, पुणे येथील समन्वयक डाॅ. यलप्पा उध्दवराव जाधव, यांना प्राथमिक स्वरूपात किट सुपूर्त करताना उजवीकडे संस्थेचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे, मध्यभागी डाॅ. जाधव, डावीकडे संस्थेचे सदस्य मिलिंद बर्वे,

मार्केट यार्ड परिसरातील गरजूंना अन्न धान्य किटचे वाटप करतांना राजकुमार धुरगुडे.

न्यूज अनकट  प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा