मुंबई, २१ सप्टेंबर २०२०: सध्या महाराष्ट्र देशात कोरोनाच्या बाबतीत सर्वात प्रभावी राज्य ठरलय. विशेष म्हणजे राज्यात २ अशी शहर (पुणे-मुंबई) आहेत जी देशात हॉटस्पॉट म्हणून ओळखली जातात. त्यातलं पुणे शहर हे देशातील सर्वात प्रभावी शहर आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील संसर्गित आकडा वाढत चालला असला तरी गेल्या तीन दिवसात बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये देखील वाढ झालीय.
राज्यात काल सलग तिसऱ्या दिवशी २६ हजार ४०८ एवढ्या उच्चांकी संख्येनं रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. काल नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २० हजार ५९८ नवीन रुग्णांचं निदान झालं होतं.
राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ८४ हजार ३४१ वर पोहोचलीय. राज्यभरातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९१ हजार २३८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे