नाशिक,२८ नोव्हेंबर२०२२: लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करावा व गोवंश हत्या बंदी कायधाची कठोर अंमलबजावणी व्हावी यासह विविध मागण्यांसाठी हिंदू समाजाच्या वतीने आज विराट मुक मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील बी.डी. भालेकर मैदानावर हिंदुत्ववाधांची मोठी गर्दी झाली.
हा मोर्चा तेथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. दिल्ली येथील श्रद्धा वालकर खून प्रकरणानंतर लव्ह जिहादविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. लव्ह जिहादच्या नावे मुलींवर धार्मिक,शारीरिक अत्याचार होत असल्याचा आरोप केला जात असल्याचं दिसून आले आहे.
त्यामुळे राज्यात हिंदू संघटनांनी एकत्रित येऊन मोर्चे काढण्यास सुरुवात केली. नाशिक शहरासह जिल्हाभरातील हिंदूत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झालेले आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हिंदू बांधव या ठिकाणी आले आहेत. या सर्व संघटना जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात येणार आहे.
मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले असल्याने शहर पोलिसांनीही बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक शहराला एक छावणी स्वरुप आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर











































