जम्मू-काश्मीर, १२ ऑक्टोबर २०२२ : १९४७ पासून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच सर्वाधिक मोठ्या संख्येने पर्यटकांनी जम्मू काश्मीर ला भेट दिली. जवळ जवळ १.६२ करोड पर्यटक ह्या वर्षी जम्मू काश्मीर मध्ये येऊन गेले. जम्मू काश्मीर मधल्या पर्यटन विभागाच्या म्हणण्यानुसार आर्टिकल ३७० हटवल्यानंतरचा हा बदल आहे.
पर्यटन अधिकारी म्हणाले की, एवढी मोठी संख्या काश्मीर पर्यटनाचे सोनेरी युग दर्शवते. काश्मीरचे पर्यटन हेच इथल्या रोजगाराचा मोठा स्त्रोत आहे.
या वर्षाच्या सुरवातीच्या ८ महिन्यात २०.५ लाख पर्यटकांनी काश्मिर चा दौरा केला. ज्यातील ३.६५ लाख तीर्थयात्री बाबा अमरनाथ यांच्या दर्शनाला गेले होते.
गेल्या ७५ वर्षांतील रेकॉर्ड बघितला तर जानेवारी 2022 पासूनचा हा सर्वात मोठा पर्यटकांचा आकडा आहे. काश्मिर नेहमीच तिथल्या पर्यटनाला प्रोत्साहन देत असते, हा त्याचाच परिणाम आहे. ह्या वेळेची खासियत अशी ठरली की येणारे पर्यटक हे फक्त जम्मू काश्मीर पर्यंत मर्यादित न राहता राजौरी पुंछ पर्यंत गेले होते.
एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा टुरिस्ट जातात, त्या मागे त्यांना मिळणारी सुविधा सुद्धा महत्वाची असते. काश्मिर ला जाण्यासाठी रस्ते, हवाईमार्ग, रेल्वे असे पर्याय उपलब्ध आहेत. खाण्या-पिण्याची , राहण्याची उत्तम सोय आहे.
जम्मू काश्मीर मधील काही लोकप्रिय पर्यटन स्थळे
१ वैष्णो देवी मंदिर
२ अमरनाथ
३ श्रीनगर
४ गुलमार्ग
५ सोनमार्ग
६ पेहेलगाम
७ नुब्रा व्हॅली
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतकी कालेकर