रुग्णाच्या पोटातून निघाला मोठा स्टिलचा ग्लास; पण शरीरात गेला तरी कसा ?

लखनऊ, ०६ ऑगस्ट २०२२: नाणी, खिळे, पिन, छोटी लोखंडी वस्तू अशा पोटातून काढल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहित असतील. पण एका व्यक्तिच्या पोटात तर चक्क ग्लास गेला आहे. त्याच्या पोटातून मोठा स्टिलचा ग्लास बाहेर काढण्यात आला. जे पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे.

उत्तर प्रदेशच्या महराजगंज जिल्हातील गोठवा भठौलीतील एका रुग्णाचं कुटुंब त्याला घेउन रुग्णालयात गेलं. आपल्या पोटात खूप वेदना होत आहे असं तो तरुण सांगत होता. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला हार्निया असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी रुग्णाच्या वैद्यकीय तपासण्या केल्या.

जेव्हा एक्स-रे करण्यात आला तेव्हा जे दिसलं ते पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. त्याच्या पोटात काहीतरी वस्तु असल्याचं दिसलं. त्याचं तात्काळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्जरी केली तेव्हा डॉक्टर शॉक झाले. कारण त्याच्या पोटातून चक्क एक ग्लास निघाला. हा स्टिलचा ग्लास होता. ज्याचा आकार चार इंच लांब आणि अडीच इंच रुदं होता.

या रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर सिद्धार्थं यांनी सांगितलं की, हे ऑपरेशन माझ्या १८ वर्षाच्या करिअरमधील सर्वात कठीन ऑपरेशन होतं. जे मी दोन तासात केले आहे. हा ग्लास गुदद्वारातून आत गेल्याची माहिती दिली आहे. आता रुग्णाला आयसीयूत ठेवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा