पुणे, दि. १६ जुलै २०२०: रशियाने जो दावा केला तो भरातील वृताकंन करण्यार्या वाहीन्यानं मधे मोठ्या प्रमणात दाखवण्यात आले नाही. पण भारतातील अनेक मिडीयने त्या बातमीवर आपली “TRP” ओढावून घेतली. रशिया हि लसीचा पहील्या टप्पा हा पार केला आसून ती आता दुसर्या टप्प्यासाठी रिसर्च करणार आहे. मात्र यासाठी पहील्या टप्प्यातील मिळालेल्या परिणामाचा ते सहा महीने अभ्यास करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या मुळे त्यांना अजुन बराच कालावधी यासाठी लागणार आहे.


शेवटच्या टप्प्यातील माॅर्डेना व्हॅकसीन
जगभरातील अंतिम टप्प्यात पोहचणारी पहीली लस हि माॅर्डेनाची असल्याचे समजत आहे. माॅर्डन कंपनी आधी पासूनच या लसीच्या बाबतीत जगात पहील्या क्रमाकांवर होती आणि त्यांनी लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा ओलांडला आसून तिसर्या टप्प्याच्या तयारी ला ते लागले आहेत. त्याची अधिकृत माहीती त्यांनी त्यांच्या साईटवर दिली.
दुसर्या टप्प्यात त्यांनी ४५ स्वंयसेवकावर याची चाचणी केली आसून त्यांचात अँटीबाॅडिज तयार झाले असल्याचे कळतंय आता ते तिसर्या टप्प्यात या लसीचे ३०,००० वाॅलिंटियरवर ते चाचणी करणार आहेत. तसेच माॅर्डेन ने सांगितले आहे की ते ऑक्टोंबर २०२२ पर्यंत यावर रिसर्च करणार आहेत पण प्रयमरी निकषावर पुढील कार्य ते करणार आहेत.
अॅस्ट्रा झिनेका ला दिसला आशेचा किरण
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अॅस्ट्रा झिनेका या कंपनीने कोविड-१९ वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु होणार आसल्याचे सांगितले जात आहे. अॅस्ट्रा झिनेका या कंपनीने या व्हॅक्सिनचे लायसन्स मिळविले आसून ही लस १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींवर प्रभावी ठरली आहे. परंतू अद्याप पहिल्या मानवी चाचणीचे अहवाल यायचे बाकी आहेत.


लस बनविणाऱ्या संशोधकांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितले की, या लसीच्या चाचणीवेळी रुग्णांच्या वाढलेल्या प्रतिकार शक्तीने त्यांना आश्चर्यचकित केले आहे.
रॉबर्ट पेस्टॉन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे
कोरोनावरील लसीबाबत मी एक पॉझिटिव्ह बातमी ऐकली आहे. अॅस्ट्रा झिनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनविलेल्या चाचणीच्या तिसऱ्या स्टेजमध्ये असलेल्या कोरोना लसीबाबत लवकरच चांगली घोषणा होणार आहे कदाचित उद्या.
अॅस्ट्रा झिनेकाच्या या लसीचे पुण्यात उत्पादन सुरु करण्यात आले आहे. अॅस्ट्रा झिनेका ही ब्रिटिश-स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी आहे. या कंपनीने भारताशी हातमिळवणी केली असून पुण्याचा सीरम इन्स्टिट्यूटसोबत मिळून या व्हॅक्सिनच्या उत्पादनालाही सुरुवात केली आहे. या कोरोना लसीचे १ अब्ज व्हायल्स बनविण्यात येणार असून ही लस कमी उत्पन्न असलेल्या देशांनाही पुरविली जाणार आहे.
यापैकी ४० कोटी व्हॅक्सिन २०२० च्या अखेरपर्यंत तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एप्रिलमध्येच सीरम इन्स्टिट्युटने याची घोषणा केली होती. यासाठी आपण मोठी रिस्क घेत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. भारतात या लसीची किंमत १००० रुपये असू शकते. सीरम ही कंपनी जगातील सर्वात मोठी औषधे निर्माण करणारी कंपनी आहे. सीरम इंस्टिट्यूट वर्षाला जवळपास १.५ अब्ज लसींचे उत्पादन करते. तर जगातील १७० देशांमध्ये त्याचा पुरवठा केला जातो. कंपनी अनेक जीव वाचविणारी लस बनविते. यामध्ये पोलिओ, फ्ल्यू, डीटीपी, आर हिपेटायटीस बी, रुबेला, मम्प्स, टिटनसचेचक अशा आजारांवरील औषधांचा समावेश आहे.
कोविड १९ च्या या लसीने अंतिम टप्पा जरी गाठला आसला तरी आजून ही लस येण्यासाठी २०२१ ते २०२२ चा मध्य उजाडू शक्यतो आसे अनेक तज्ञांचा दावा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी