नांदेड, दि.१९ मे २०२० : नांदेडहून देशी दारूचा पुरवठा करणारा ट्रक उमरीकडे जात असतांना जामगाव जवळील रस्त्यावर चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटला. त्यामुळे तळीरामांची चांगलीच चंगळ झाल्याची पहायला मिळाली.
जामगाव येथील लोकांना ही घटना समजताच त्यांनी धावाधाव करत देशी दारूचे बाॅक्स घेऊन धुम ठोकली. तर फुकटची दारू मिळाल्याने तळीरामांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दोन महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी वाॅईन शाॅप, बिअर शाॅपीसह देशी दारूच्या दुकानातून मद्य विक्रीस परवानगी दिली होती. या अनुषंगाने नांदेडहून उमरीकडे देशी दारूचे बॉक्स घेऊन ट्रक क्र.एमएच ४३ वाय ११०२ सकाळी जात होता.
या अपघातात देशी दारुचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी दारूचे बाॅक्स घेऊन धुम ठोकली. लॉकडाऊनच्या काळात तळीरामांची चंगळ झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
न्युज अनकट प्रतिनिधी: