कोरोनाच्या दरम्यान चीनमध्ये ‘Langya ‘ या नवीन विषाणूने केली एंट्री, जाणून घ्या त्याची लक्षणे

पुणे, १० ऑगस्ट २०२२: जगभरातील देश अजूनही कोविड-१९ आणि आता मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावाशी दोन वर्षांनंतरही झुंज देत त्यातच एका नवीन विषाणूने सर्वांच्या चिंतेचं दार ठोठावलं आहे. चीनमध्ये प्राण्यांपासून मानवांमध्ये एक नवीन विषाणू आढळून आला आहे, ज्यामुळे आतापर्यंत ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतात आतापर्यंत ३५ लोकांना हेनिपाव्हायरसची लागण झाली आहे.

Henipavirus ला Langya या नावाने देखील ओळखले जाते आणि तो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. स्थानिक मीडिया अहवालात म्हटले आहे की व्हायरस शोधण्यासाठी आणि त्याच्या प्रसाराचा मागोवा घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी न्यूक्लिक अॅसिड चाचण्या वापरण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत व्हायरसबद्दल काय माहिती?

डेली मेलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की मानवांमध्ये, Langya पहिल्यांदा चीनच्या शेंडोंग प्रांतात जानेवारी २०१९ मध्ये आढळला होता. काही दिवसांनंतर, देशाच्या इतर भागांमध्ये १४ नवीन प्रकरणे आढळून आली. तथापि, अहवालानुसार, महामारीच्या पहिल्या वर्षाच्या जानेवारी ते जुलै २०२० दरम्यान कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली नाहीत.

अहवालानुसार, हा विषाणू मोलसारख्या लहान प्राण्यांपासून आला आहे, ज्यांचे शरीर लांब, लहान, पातळ हातपाय आणि नखे आहेत. चीनी संशोधकांना सुमारे २६२ मोल्समध्ये ७१ प्रकरणे आढळली.

Langya विषाणूची लक्षणे कोणती?

ताप हे संक्रमित रुग्णांमध्ये आढळणारे सर्वात सामान्य लक्षण होते. दुसरीकडे, ५४ टक्के रुग्णांमध्ये अशक्तपणा, ५० टक्के रुग्णांमध्ये खोकला, ५० टक्के रुग्णांमध्ये भूक न लागणे, ४६ टक्के रुग्णांमध्ये स्नायू दुखणे आणि ३८ टक्के रुग्णांमध्ये मळमळ झाल्याचे दिसून आले.

Langya व्हायरस किती धोकादायक आहे?

आतापर्यंत Langya विषाणूची प्रकरणे प्राणघातक किंवा गंभीर असल्याचे सिद्ध झालेले नाही.

Langya विषाणूची लस उपलब्ध आहे का?

सध्या Langya विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा