पुणे रेल्वे स्थानकावर चेंगरा चेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू, दिवाळी सुट्टीत गाड्या न वाढविल्यने प्रवाशांचे अतोनात हाल

पुणे, २३ ऑक्टोबर २०२२ : पुणे – दानापूर रेल्वेगाडीत चढताना झालेल्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यु झाला. ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या चेंगराचेंगरीत आजून एक प्रवासी गाडीखाली सापडल्याचे समाजते. बौधा मांजी ऊर्फ यादव (वय २१) असे मृत्यु पावलेल्या प्रवाश्याचे नाव आहे.

या घटनेबाबत रेल्वे पोलीसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, पुणे -दानापूर ही रेल्वे गाडी पुणे स्थानकावरील प्लॅटफाॅर्म १ वर येत होती. त्यावेळी जनरल डब्यात चढत असताना एक प्रवासी खाली पडला. त्यात तो बेशुद्ध झाला. त्याला रेल्वे पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात घेऊन गेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पुणे – दानापूर ही गाडी बाराही महिने हाऊसफुल्ल चालते. असे असूनही यंदा दिवाळीच्या काळात मध्य रेल्वेने बिहारकडे जाणाऱ्या गाड्यावाढवल्या नाही. या गाडीला पुढे आणि मागे असे प्रत्येकी दोन जनरल डबे असतात. या डब्यांमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. गाडी प्लॅटफॉर्मवर येत असताना शेवटच्या दोन डब्यांमध्ये चढण्यासाठी गर्दीमध्ये प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यात मांजी हे खाली पडले. त्यांच्या अंगावरुन लोक डब्यात चढत होते. त्यात ते बेशुद्ध पडले. प्लॅटफॉर्म वरील लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रेल्वे पोलिसांना कळविले. त्यांना प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला. नंतर ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यु झाल्याचे घोषित करण्यात आले.

उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना कायमच मोठी गर्दी असते. त्यातच दिवाळी सणामुळे लोक गावी जाण्यासाठी या गाडीसाठी आले होते. गरीब कामगार, कष्टकरी प्रवाशांकडे रेल्वे प्रशासन कायमच दुर्लक्ष करते. त्यामुळे गावाकडे जाणाऱ्या सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन एका प्रवाशाला आपला प्राण गमवावा लागला.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा