माढा, दि. ४ सप्टेंबर २०२०ः कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस ग्रामीण भागात पसरत चालले आहे. यावर मात करण्यासाठी माढा तालुका व माढा विधानसभा मतदार संघातील गावोगावच्या प्रत्येक लहान-मोठ्या, स्त्री-पुरुष, आबालवृद्ध नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन covid-19 ची टेस्ट करून घ्यावी, असे आव्हान आमदार बबनदादा शिंदे यांनी सर्वांना केले आहे. या प्रत्येक ठिकाणी अँन्टिजीन रँपीड टेस्ट, स्वाँब टेस्ट, टेंप्मरेचर आणि आँक्सिजन या सर्व टेस्ट न घाबरता करून घ्याव्यात म्हणजे स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला आणि समाजालाही पूर्णपणे सुरक्षित राहता येईल. कोणताही नागरिक काही कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर चुकून जरी संशयित कोरोना पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कात आला असेल तर त्यांनी ही ताबडतोब आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची टेस्ट करून घ्यावी. प्रत्येक गावातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी, आरोग्य सेवक व आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना मदत करावी व सहकार्य करावे अन्यथा पर्यायी याचे गंभीर असे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असे आमदार शिंदे यांनी नागरिकांना आवर्जून सांगितले आहे.
शेटफळे येथे मेडिकेटेड कोविड सेंटर व टेंभुर्णी येथे प्रायमरी कोविड सेंटर तातडीने चालू करण्यात यावे अशी मागणी आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. शेटफळ येथे उपजिल्हा रुग्णालय आहे व या ठीकाणी एक एमबीबीएस मेडिकल अधिकारी पण आहे. मोडनिंब व परिसरातील नागरिकांना पंढरपूर, मोहोळ किंवा सोलापूर येथे उपचारासाठी बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शेटफळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पन्नास बेडचे अत्यावश्यक साधनांनी युक्त असे मेडिकेटेड कोविड सेंटर तातडीने तयार व्हावे. तसेच टेंभुर्णी शहर व परिसरातील रुग्णांच्या उपचारासाठी येथील संकेत मंगल कार्यालयामध्ये प्रायमरी कोविड सेंटर तयार करण्यात यावे अशी आग्रही मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
दिनांक ३ सप्टेंबरपर्यंत माढा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात तपासणी केलेल्या व्यक्ती ४८६३ असुन तपासणीसाठी पाठवलेले स्वाँब नमुने एकुण२२८० आहेत. एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती ७१४० आहेत यांपैकी ११३२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव आलेल्या होत्या. यातील सातशे व्यक्ती बरे होऊन घरी गेलेल्या आहेत, तर फक्त ३२ व्यक्ती मयत झालेले आहेत.
सर्वच नागरिकांनी कोरोना व्हायरस या महामारीची काळजी करण्यापेक्षा तो रोग होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. यासाठी आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर जाणे ,तोंडाला मास्क वापरणे, गरम पाणी पिणे, सँनेटायझरचा वापर करणे, वेळोवेळी हात-पाय स्वच्छता राखणे, गरम पाणी पिणे, सोशल डिस्टंसिंगची काळजी घेणे, नियमित साधा आहार घेणे व दररोज नियमितपणे व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे असेही आमदार शिंदे यांनी नागरिकांना आवर्जून सांगितले केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील